Ad will apear here
Next
‘पाऊस न्हाय म्हणून शेतीची कामे थांबवायची का?’


सोलापूर : ‘पावसाचा अजून पत्ताच न्हाय... आत्ता जरी पाऊस पडला, तरी पेरणी करताच येत न्हाय...आकाड सरला की लगीच सरावन लागतूय...अणं सरावनात, तर बैल पोळ्याला ज्वारीची पेरणी करावी लागतीय... यंदाचा ही हंगाम वायाच गेला बघा... पाऊस काशाचा नुसत वारच भकाय लागलय...!  आज उद्या पाऊस पडलच की पाऊस न्हाय म्हणून शेतीची कामे थांबवायची का? खरीप न्हाय साधला रब्बी, तर साधल...!’ कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर  येथील शेतकरी मारूती गोपीनाथ हेळकर यांनी हा आशावाद व्यक्त केला.

जिल्हयात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना होळकरांचा हा आशावाद प्रेरणादायी आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चांगलाच साधला होता. रब्बी हंगामासाठी हा जिल्हा प्रसिद्ध असला, तरी खरीपाचेही क्षेत्र मोठे आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम साधले, तरच शेती परवडते. एकाच हंगामावर अवलंबून राहिले, तर शेती परवडत नसल्याचा शेतकऱ्यांना चांगलाच अनुभव आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही गावांत पाऊस पडला असला, तरी जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पंढरपूर व मोहोळ तालुक्यात अजूनही दमदार पाऊस पडला नाही. आठ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता; पंरतु सायंकाळी उशीरापर्यंत जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस पडल्याची नोंद झाली नाही. उलट दिवसभर वाराच सुटत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.

पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांची लागवड करता आली नाही आणि आता चांगला पाऊस पडला, तरी उशीराची पेरणी चांगली साधत नसल्यामुळे शेतकऱ्यांची भीस्त आता रब्बी हंगामावरच आहे. गेल्या आठवड्यात पाऊस पडलेल्या गावांमध्ये थोडीफार मक्याची पेरणी शेतकरी करू लागले आहेत; मात्र रब्बी हंगाम सापडत नसल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी तूर, मूग, सोयाबीन व उडदासारख्या पिकांची पेरणी केली नाही. पाऊस पडला नसलेल्या भागातील शेतकरी सध्या शेतीची मशागत करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.

या वेळी रोपळे बुद्रुकचे शेतकरी पोपट भोसले यांनी आमची भीस्त आता रब्बी हंगामावरच असल्याचे सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZTLBQ
Similar Posts
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला
रोपळे येथे साखरेचे अल्प दरात वाटप सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सणासुदीच्या दिवसांत घरपोच साखर मिळाल्याने सभासदांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट सोलापूर : मूकबधिर विद्यार्थांना वाचासिद्धीसाठी रोपळे (पंढरपूर) येथील सुप्रभात ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामुहिक श्रवण यंत्र भेट दिले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language